मराठीत काहीतरी बोधप्रद आणि अनुभवात्मक लिहिण्याच्या ध्यासाने या ब्लॉगची सुरुवात झाली. स्वतःच्या भावना आणि विचार ठामपणे व्यक्त करण्यासाठी मातृभाषेसारखे दुसरे कोणतेच साधन नाही, हे मला आतापर्यंतच्या निरीक्षणातून समजलंय. तरीही, इंग्रजीतही www.metaperse.in ह्या नावाने माझा ब्लॉग आहे, जो तितकाच महत्त्वपूर्ण आहे; पण शेवटी, इंग्रजी ही भाषा जगाची आहे, तर मराठी आपल्या 'जनांची'. तुमचं इथे मनापासून स्वागत.